- प्राधिकरणाच्या सेक्टर १२ मधील गृहप्रकल्पास आणखी विलंब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. ऑक्टोबर २०२१) :- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे सेक्टर १२ येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी हा गृहप्रकल्प आहे. यातील सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्याची सोडत मे महिन्यात काढली होती. सोडतीअंतर्गत मिळालेल्यांना लाभार्थीना तात्पुरते वाटपपत्र मिळूनही घर मिळेल की नाही याची धाकधूक लागली आहे.
सध्या या नागरिकांची कागदपत्रे पडताळणी सुरू आहे. २० ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढून देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी २९.५५ चौरस मीटर चटई क्षेत्राच्या तर अल्पउत्पन्न गटासाठी ५९.२७ चौरस सदनिका मीटर चटई क्षेत्राच्या सदनिका उपलब्ध होतील. गृहसंकुलातील नागरिकांच्या सोयीसाठी १४० दुकानांची योजना प्रस्तावित आहे. हा प्रकल्प टाटा मोटर्स व स्पाइन रस्त्याजवळ, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळ असून, ११ मजल्याच्या एकूण ४५ इमारतींचे बांधकाम चालू आहे.
प्रतीक्षा यादीतील लाभार्थीचा कागदपत्रे पडताळणीचा कालावधी हा १० ऑक्टोबरपर्यंत होता. सर्व लाभार्थीच्या कागदपत्रांची पडताळणी ५ ऑक्टोबरपर्यंत झाली नाही. त्यामुळे २० ऑक्टोबर मुदतवाढ दिली आहे.
– आशाराणी पाटील, जनसंपर्क अधिकारी, प्राधिकरण.