न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती नितीन लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसदस्य अजीत गव्हाणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेटटी आदी मान्यवर उपस्थित होते.
कॅप जेमिनी कंपनीकडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड लॉकर, १ हाई पॉवर एक्सरे मशीन, १ सोनोग्राफी मशीन, २ बायोमेडीकल वेस्ट कंटेनर, १वॉटर प्यूरीफायर, आदी सुमारे २ कोटी ५० लाखाची साहीत्य सी एस आर फंडातून सुपुर्द करण्यात आले.