न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जाने.) :- सर्व धर्म, जाती, पंथांच्या अध्यात्मिक विचारांचा आदर करीत ‘मानवता’ हाच खरा धर्म हे विचार भगवान बाबांनी समाजात रुजविण्यासाठी जनजागृती केली. विजया दशमीच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील भगवान बाबा गडावर लाखोंच्या जनसमुदाय त्यांच्यापुढे नतमस्तक होण्यासाठी जमतो. राष्ट्रसंत भगवान बाबा हे वंजारी समाजाचे दैवत आहे. भगवान बाबांचे विचार आचरणात आणणारे कोट्यावधी अनुयायी देशभर आहेत. मानवतेची, समानतेची, एकता व अखंडतेची शिकवण देणा-या या राष्ट्रसंतांच्या मुर्तीची विटंबना अहमदनगर जिल्ह्यातील स्वप्निल शिंदे या समाजकंटकाने दोन दिवसांपुर्वी केली.
या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा द्यावी या मागणीसाठी बुधवारी (दि. १६ जानेवारी) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात उद्योजक आबासाहेब नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. निदर्शनानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रसंत भगवान बाबा प्रतिष्ठान, जय भगवान युवा फाऊंडेशन, ओबीसी संघर्ष समिती, भगवान सेना, भगवान बाबा युवा मंच, जय भगवान महासंघ, भगवान बाबा मित्र मंडळ, ब्रम्हचैतन्य फाऊंडेशन, लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कृती समिती पिंपरी चिंचवड, मराठावाडा जन विकास मंच, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, गोपीनाथ मुंडे फाऊंडेशन आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रा. गणेश ढाकणे, कैलास सानप, दिपक नागरगोजे, डॉ. सुभाष ढाकणे, कुसूम नागरगोजे, जयश्री खरमाटे, आनंदा कुदळे, वैजनाथ शिरसाट, सुरेश गायकवाड, महादेव सानप, हनुमंत घुगे, लक्ष्मण मरकळ, विनोद मुंडे, व्हि.बी.सानप, अमोल नागरगोजे, ज्ञानेश्वर नागरगोजे, उध्दव हांगे, भागवत खेडकर, लक्ष्मण वाघ, राजश्री जायभाय, कविता आडाणे, खंडू खेडकर आदींनी सहभाग घेतला होता.











