- परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने व्यवस्थापनाला लागतोय वेळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून १७ ऑक्टोबरला होणारी पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २३ ऑक्टोबरऐवजी ही लेखी परीक्षा १९ नोव्हेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ७२० पदांसाठी एक लाख ८९ हजार ७३२ परीक्षार्थीची निवड झाली आहे.
परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत नियोजन केले जात आहे. परीक्षार्थींना त्यांच्या सोयीचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याला हॉलतिकिट, परीक्षा केंद्र, याबाबत अचूक माहिती देण्यात येणार आहे.
त्याचे परीपूर्ण नियोजन करता यावे म्हणून संबंधित व्हेंडार कंपनीने वेळ वाढवून मागितली. त्यानुसार १९ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
















