- निगडीतील घटना; तिघांना कोठडी, इतरांवर गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२१) :- कोकणात जागा तसेच आंब्याचे कलमे लावून, एक बीएचके स्लॅबचा बंगला, कंपाउंड, तीन वर्षांचा मेंटेनन्स इतर गोष्टी नावावर करून देण्याचे अमिश दाखवले. या गोष्टी न झाल्यास पैशांचा मोबदला म्हणून म्हणजे व्याज, दामदुप्पट रक्कम परत करण्याचे आश्वासन आरोपींनी फिर्यादीला दिले.
आरोपींनी फिर्यादी आणि इतर दोघांकडून ७२ लाख ४४ हजार ५०० रुपये घेतले. प्रत्यक्षात काहीच करून न देता फिर्यादीची फसवणूक केली. जागेचा फेरफार तिर्हाईताच्या नावावर असल्यामुळे फिर्यादीच्या नावाने जागेचा ७/१२ देखील होत नाही. ही घटना २०१७ ते १८ ऑक्टोबर दरम्यान पोयरे, देवगड, जि. सिंधुदुर्ग आणि प्राधिकरण निगडी, पुणे येथे घडली.
रवी चिंतामणी भंडारे (वय ६५, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश रामचंद्र बांदकर (वय ५७), गीतांजली गणेश बांदकर (वय ५५), अभिषेक गणेश बांदकर (वय ३४), एकता अभिषेक बांदकर (वय ३२), सागर गणेश बांदकर (वय २८, सर्व रा. प्राधिकरण, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश, अभिषेक, सागर यांना पोलिसांनी अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.