न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बुधवारच्या (दि. २०) सर्वसाधरण सभेला चक्क शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नागरिकांच्या काचेआड कक्षात बसून उपस्थिती दर्शविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आज नियोजित सर्वसाधरण सभा होती. महापौर माई ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पक्षाचे नगरसेवक विरोधात बोलतात की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी पाहणी केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.