- स्थानकात थांबलेल्या विना चालक बसने क्षणात तीन रिक्षांना ठोकले..
- एक रिक्षाचालक जखमी; घटनेची चौकशी सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२१) :- निगडी स्थानकावर चालक नसणारी पीएमपीएमएल बस थांबलेली होती. ही बस अचानक चालू झाली अनं क्षणात पुढे जाऊन तीन रिक्षांना धडकली. ‘टार्झन द वंडर कार’ चित्रपटातील दृश्याला साजेशी अशी ही घटना निगडीत घडलेली आहे.
अपघातात एका रिक्षा चालकाच्या उजव्या हाताजवळ आणि मनगटाजवळ दुखापत झाली आहे. सचिन ज्ञानेश्वर शिंदे असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. जखमी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बस नेमकी कोणत्या कारणामुळे पुढे गेली याबाबत चौकशी सुरु आहे. ही घटना गुरुवारी (दि. २१) सकाळी घडली, अशी माहिती पीएमपीएमएल अपघात विभागाचे साहिल काथे यांनी दिली.