न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) :- आपल्या कर्तुत्वाने पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकामध्ये भर घालणारे खेळाडू, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर व्यक्ती अशा मान्यवरांना महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
माधुरी गरुड, ऋतुराज गायकवाड, ह.भ.प. सतीश महाराज काळजे, प्रसाद पाटील तसेच कु. श्रावणी देसाई, खुशी मुल्ला, स्वरांजली मुळे, अॅड. जया उभे, मयूर पुंडे, भीमराव चौधरी, युनुस पठाण तसेच दिवाणजी यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह व पुस्तक भेट देऊन महापालिकेत नुकताच गौरव करण्यात आला.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.