- अहमदाबाद येथील संस्थेची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग करण्यात आलेल्या जमिनीचे सर्व्हेक्षण करून महापालिका नवा नकाशा तयार करणार आहे. त्यासाठी अहमदाबाद येथील एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंटची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार राज्य अधिसूचनेनुसार सरकारमार्फत ७ जून २०२१ रोजीच्या पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे ( पीसीएनटीडीए ) पिंपरी – चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात विलीनीकरण (पीएमआरडीए) करण्यात आले आहे. त्यानुसार पीसीएनटीडीए विसर्जित करण्यात आले असून त्याचे कामकाज बंद केले आहे. तसेच पिंपरी – चिंचवड महापालिकेस विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
अधिसूचनेतील अटींनुसार, हस्तांतरणाची प्रक्रिया, सर्व चल, अचल मालमत्ता आणि दायित्वे, निधी व देय रकमा, पीसीएनटीडीएच्या लँड डिस्पोजल पॉलीसी’नुसार लिज रेंट, अतिरिक्त अधिमूल्य आदी सर्व शुल्कांची वसुली करणे, न्यायालयीन दाव्यांचे दायित्व, १२.५ टक्के परताव्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत पीसीएनटीडीएच्या मालमत्ता पालिकेकडे राहणार आहेत.