न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- फिर्यादी यांची बहीण, दाजी व त्यांची सहा वर्षीय मुलगी दुचाकीवरून शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चालले होते. ते फुगेवाडी येथे आले असता त्यांच्या दुचाकीस आरोपीच्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली.
त्यानंतर आणखी एका दुचाकीस धडक दिली. फिर्यादीची बहीण, दाजी आणि अन्य एका दुचाकीवरील एक असे तिघेजण गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादीच्या सहा वर्षीय भाचीचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
राजेश हिरालाल यादव (वय ३४, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. २९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शशी शंकर राजू (वय ४५, रा. मीरारोड, मुंबई) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.












