- तब्बल २२ हातगाड्या आणि इतर समान जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील फुटपाथवर महापालिकेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात गुरुवारी (दि. २८) पुन्हा धडक मोहीम राबवण्यात आली. दुकानदारांनी फुटपाथवर थाटलेले दुकाने, सामान, वस्तू जप्त केल्या आहेत.
बारणे कॉर्नर, दत्तनगर, गणेशनगर डांगे चौक, थेरगाव फाटा, तापकीर चौक आदी परिसरात फुटपाथवर ठेवलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. कारवाईत ५ बोर्ड, २ प्लॅस्टिक स्टुल, ११ प्लास्टिक बादली, ८ प्लास्टिक ट्रे, १ सिलेंडर, १ तार बंडल, १० गॅस पाईप, १० आणि २२ हातगाड्या जप्त केल्या आहेत.
या कारवाईमध्ये क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके, अतिक्रमण पथक प्रमुख जगताप, बीट निरीक्षक व ग क्षेत्रीय अतिक्रमण पालिका कर्मचारी व ४ पोलिस कर्मचारी सहभागी होते.












