- आ. शंकर जगताप यांचे आयुक्तांना पत्र…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२० जानेवारी २०२६) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुड गव्हर्नन्स’ संकल्पनेनुसार नागरिकांना मूलभूत सेवा तत्काळ मिळाव्यात, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालयांची संख्या ८ वरून १० करण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी पत्र दिले आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारसंख्या १७ लाखांहून अधिक असून मागील दहा वर्षांत लोकसंख्या, नागरीकरण आणि तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या कार्यरत ८ क्षेत्रीय कार्यालयांवर प्रशासकीय व सेवा-संबंधित कामांचा ताण वाढल्याने नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील तरतुदीनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग समित्यांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले. क्षेत्रीय कार्यालये १० झाल्यास सेवा विकेंद्रीकरण प्रभावी होईल, तक्रारींचे जलद निराकरण होईल आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












