- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२१) :- उद्योजक व वाकड भागातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील युवा उद्योजक संतोष गुलाबराव कलाटे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्यपदी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षकार्य वाढविण्यासाठी व त्यांच्या समाजकारण व पक्षाकरिता केलेल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ आमदार लक्ष्मण जगताप व पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थायी समितीचे मा. अध्यक्ष विलास मडीगेरी आदी उपस्थित होते.












