- शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२१) :- देहूरोड बाजारात दिवाळी सणाच्या अनुषंगाने साध्या वेशात फिर्यादी गस्त घालत होते. त्यावेळी बालाजी लंच होम येथे आरोपीने शिवीगाळ करून पोलिसाशी झटापट केली. त्यांना जमिनीवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शासकीय कामात आरोपीने अडथळा आणला, असे फिर्यादीत नमूद आहे.
देहूरोड येथे शनिवारी (दि. ३०) रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अरविंद लक्ष्मण ढिल्लोड (रा. पारशीचाळ, देहूरोड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली.












