- तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ नोव्हेंबर २०२१) – जुन्या व्यवहाराच्या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी रिक्षा चालकाने देखील मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने फिर्यादी यांना पकडले आणि दुसऱ्याने लाकडी दांडक्याने व पीव्हीसी पाईपने मारहाण केली.
हा प्रकार शुक्रवारी (दि. २९) दुपारी तुपेवस्ती, मोशी येथे घडली. विनोदकुमार वसंत चांदगुडे (वय ३६, रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लक्ष्मण म्हस्के (रा. देहूगाव), सचिन कोकरे (रा. चिखली), एक रिक्षा चालक (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












