- अध्यक्षपदासाठी चौघात चुरस; कार्यकारिणी जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनची शनिवारी (दि. ३०) निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. सचिन थोपटे निवडून आले आहेत. अध्यक्ष पदासाठी अॅड. सचिन थोपटे, अॅड. पांडुरंग शिनगारे, अॅड. रामहरी कसबे, अॅड. मुकुंद ओव्हाळ हे चार उमेदवारांत लढत झाली.
या निवडणुकीत एकूण ६९.२६ टक्के इतके मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. पुढील एका वर्षासाठी या कार्यकारिणीची निवड झाली आहे. गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या निवडणुकीत एकूण १ हजार ४९० मतदारांपैकी १ हजार ३२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यात अॅड. गोरख मकासरे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. आहे
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-
अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे, उपाध्यक्ष – अॅड. गौरव वाळंज, सचिव – अॅड. निखिल बोडके, अॅड. प्रियंका सुरवसे, सह सचिव – अॅड. सुनील रानवडे, खजिनदार – अॅड. अनिल पवार, सदस्य – अॅड. संतोषी काळभोर, अॅड. स्नेहा कांबळे, अॅड. मंगेश खराबे, अॅड. महेश मासुळकर, अॅड. सरिता मोरे, अॅड. ऐश्वर्या शिरसाट,
यात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. सुशील मंचरकर, अॅड. देवराव ढाळे, अॅड. सुभाष चिंचवडे, अॅड. उत्तम चिखले, अॅड. विलास कुटे, अॅड. विजय शिंदे, अॅड. अनिलकुमार तेजवानी, अॅड. सुहास पडवळ, अॅड. संजय दातीर पाटील यांनी कामकाज पाहिले.












