- आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ नोव्हेंबर २०२१) :- चिंचवडगाव येथील पवना नदी पुलावर अनोळखी जेष्ठ महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. आज सोमवारी (दि. १) रोजी दुपारी ११.३० ते १२.०० च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पुलावर बघ्यांची गर्दी जमली होती. नदीपात्रात पाणी कमी असल्यामुळे मृतदेह पाण्यावर तरंगत होता. पोलिसांनी महिलेला पाण्याबाहेर काढले. परंतु रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
महिलेची ओळख पटली असून शोभा नागू सूर्यवंशी (वय ७०, रा. मोरया नगर, चापेकर चौक, चिंचवडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












