- पोलिसांकडून एकाला अटक; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२१) :- चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या पार्किंगमध्ये भंगार साहित्य शनिवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास आरोपींनी चोरण्याचा प्रयत्न केला.
पार्किंगमधून लोखंडी भंगारचे मटेरियल, लोखंडी प्लेटा, लोखंडी चॅनेल असा एक हजारांचा माल होता. ही घटना शनिवारी (दि. १३) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली.
महेश मोहन पवार (वय २५, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तोष शाम रोकडे, दिगंबर उर्फ डिग्या कादरखान करंडे, संजय उर्फ संज्या कादरखान करंडे, आकाश उर्फ गोट्या धोत्रे (सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी संतोष रोकडे याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












