- महापालिकेची पुढील सभा गुरुवारपर्यंत तहकूब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज सोमवारी (दि. १६) रोजी पार पडली. काही कारणास्तव महापौर उषा ढोरे सभेस गैरहजर होत्या. त्यांच्या जागी उपमहापौर घुले यांना महापौर म्हणून महापालिका सभा कामकाज चालविण्याची संधी मिळाली. त्यांना पीठासीन अधिकारीपदाचा बहुमान मिळाला.
सभेत सर्वानुमते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव मंजूर झाला. उपस्थित नगरसेवकांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.
नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी चर्चेत सहभाग घेतला. अर्ध्या तास चाललेल्या सभेचे कामकाज नंतर थांबविण्यात आले. महापालिकेची पुढील सर्वसाधारण सभा गुरुवार (दि. १८) रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केल्याचे महापौर घुले यांनी जाहीर केले.












