- दोघांची धमकी; चिखलीत तरुणाची आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२१) :- मोरेवस्ती चिखली येथे फिर्यादीचा मुलगा भाड्याने राहत होता. आरोपींनी त्याला ‘पैसे देऊन बाई वैशालीचे प्रकरण मिटव. नाहीतर तुला बघून घेईन’ अशा धमक्या दिल्या. आरोपींच्या या त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरात आत्महत्या केली. पंडितराव गणपती चौरे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे चिट्ठीत म्हटले आहे. ही घटना शनिवारी (दि. १३) पहाटे पावणे चार वाजता घडली.
गणपती रामभाऊ चौरे (वय ६५, रा. जीवाचीवाडी, ता. केज, जि. बीड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कल्याण चन्ने, राजेंद्र तांदळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.












