- कोयत्याच्या धाकाने टोळक्याने लुटले; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२१) :- बहिणीला भेटून हडपसरकडे दुचाकीवरून घरी जात असताना निगडीतील ओटास्किममधील चिकन चौकाजवळ आरोपींनी फिर्यादीना अडवले. शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता एकाने कोयत्याने मारहाण करून फिर्यादीना जखमी केले.
इतर आरोपींनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली. दुसऱ्याने दगडाने मारून फिर्यादीच्या खिशातून जबरदस्तीने २३ हजार ७४० रुपये काढून घेतले. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. मुकुंद अशोक भंडारी (वय २८, रा. हडपसर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धुनगाव, भाव्या बाविसकर (दोघे रा. ओटास्कीम, निगडी) आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.