- तिघांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२१) :- ताथवडे चौकातील रावेत-डांगे चौक रस्त्यावरील एका हातगाडीच्या समोर खरेदीसाठी गेलेल्या इसमाचा आणि आरोपींचा किरकोळ कारणावरून वाद झाला. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले.
हा प्रकार गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान घडला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. मल्लिकार्जुन उर्फ मल्लू अवधूत पतडे (वय ४९, रा. ताथवडे गाव, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
लक्ष्मी मल्लिकार्जुन पतडे (वय २०) याने वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी फिर्याद दिली. ऋषीकेश चपाले, महेश पवार (दोघे रा. ताथवडे), पवन सिंग (रा. पुनावळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.