- बससह नऊ वाहनांची तोडफोड; वाहन चालकांची रक्कमही हिसकावली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- दोन अल्पवयीन मुलांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या बससह नऊ वाहने फोडली आहेत. दगडाच्या सहाय्याने त्यांनी हे कृत्य केलं.
आरोपींनी फिर्यादीच्या वाहनाचे नुकसान करीत त्यांच्या खिशातून ८०० रुपये तसेच आणखी एका वाहन चालकाच्या खिशातून काही रक्कम हिसकावून घेतली.
हनुमंत रोहिदास कसबे (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, वाल्हेकरवाडी) यांनी रविवारी (दि. ७) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. लोकांनी आपल्याला भाई म्हणून ओळखल पाहिजे, यासाठी या दोघांनी हे गुन्हेगारी कृत्य केलं. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.