रहाटणीतील १६ अनाधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ ग ‘ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत गुरुवारी (दि. २५) रोजी शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
(प्रभाग क्र. २७) रहाटणी येथील नढे कॉर्नर, शिवलीला कॉलनी, शिवालय कॉलनी, शिवधाम कॉलनी ई, तापकीर परिसरातील रहिवासी, व्यावसायिक, निळी पूररेषा, हरित पट्टा भागातील १६ वाढीव व नव्याने झालेल्या आर. सी. सी. पत्राशेड, वीट बांधकाम अशा एकूण अंदाजे १३४६१.०० चौ. फु. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली, अशी एकूण रहाटणीतील १६ अनाधिकृत बांधकामं पाडण्यात आली.
ही कारवाई ०३ जेसीबी, १ डम्पर, १२ मजूर, ०२ ब्रेकर आणि मनपाचे २५ पोलीस कर्मचारी अधिकारी, वाकड पोलीस स्टेशनचे १२ पोलीस कर्मचारी अधिकारी याच्या सहकार्याने केली.
पालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त (२) जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता सुनील भागवानी, क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता नितीन निंबाळकर, ०२ कनिष्ठ अभियंता, ०५ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व १२ मनपा कर्मचारी यांच्या पथकाने केली.