- महापालिका व पीएमआरडीएचे अग्निशामन दल घटनास्थळी दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२१) :- देहूतील इंद्रायणी नदीकाठी पोहायला गेलेली दोन सख्खी भावंड नदीत बुडाली आहेत. साहील विजय गौड (वय १० वर्षे), अखिल विजय गौड (वय ८ वर्षे, रा. देहूगाव सिद्धेश्वर मंदिराजवळ, मुळगाव देवरिया देहात, कुशिनगर, गोरखपूर) अशी या बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
शुक्रवारी (दि. २६) रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास माळीनगर बायपास, इंद्रायणी नदी पुलाखाली ही घटना घडली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त नदीला मोठे पाणी सोडण्यात आले आहे. या वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले नदीच्या पाण्यात बुडाली असावीत, असा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी शोधाशोश केली. पोलीस आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीएचे अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. त्यांना मदतीसाठी एनडीआरएफच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आले आहे.












