- तिघींची सुटका; दोघांवर पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२१) :- पिंपरीतील हॉटेल जिंजरमधील Oregano Spa & Saloon मध्ये आरोपींनी तीन महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्यांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळणा-या पैशांवर आरोपींनी त्यांचा उदरनिर्वाह भागवला.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (दि. १) दुपारी चारच्या दरम्यान छापा मारून कारवाई करत नागालँड येथील दोन तर महाराष्ट्रातील एका महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका केली. आरोपींकडून नऊ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देवेंद्रकुमार झा (वय ३५), स्नेहकुमारी श्रीब्रजनंदन झा (वय ३०, दोघे रा. खराळवाडी, पिंपरी. मूळ रा. झारखंड) या आरोपींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, भारतीय दंड विधान कलम ३७० (३), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















