- नाव-गाव नसणाऱ्या पोस्टरने नागरिकांना पाडले बुचकळ्यात..
- अज्ञात पोस्टरधारकांचा शोध घेऊन त्यांना समज द्या; नागरिकांमधून मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२१) :- ‘ सहावीला पिंपरी चिंचवडला आलो.’ अशा आशयाचे पोस्टर नेहरूनगरला येथे लागले असून त्याचा आशय आणि अर्थ काय? हे कळत नसल्यामुळे शहरातील नागरिक बुचकळ्यात पडले आहेत.
शहराला असा ट्रेंड काही वेगळा नाही; याआधी देखील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर लिहलेला पोस्टर व्हायरल झाला होता. त्यानंतर ‘शिवडे, आय एम सॉरी’ या पोस्टरचीही मोठी चर्चा होत होती. याशिवाय काही राजकीय पोस्टरने देखील नागरिकांचे लक्ष विचलित केले होते.
पोस्टरमागचे खरे अज्ञात सूत्रधार हटके पद्धतीने प्रसिद्धीद्वारे सर्वांचे लक्ष विचलित करून काय साध्य करू इच्छितात? असा सवाल नागरिक करू लागले आहेत. शहरातील नागरिकांचे लक्ष विचलित करणाऱ्या अशा अज्ञात पोस्टरधारकांचा शोध घेऊन त्यांना योग्य ती समज द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसून येत आहे.
















