- तब्बल सहा जणांना ओमायक्रॉनची बाधा; तर पुण्यात एकजण बाधित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२१) :- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉनचे तब्बल ७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ही एकूण ८ इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
या ७ पैकी ६ जण हे पिंपरी चिंचवड शहरातील आहेत. तर उर्वरित १ जण पुण्यातील आहे. या ७ जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे या ७ जणांपैकी ३ जणांनी कोरोना लस घेतलेली नाही.
सहापैकी ३ जण नायजेरियामधून आल्याची माहिती मिळाली आहे. तर इतर ३ जण त्यांच्या जवळचे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी १३ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ४५ वर्षांचा भाऊ, दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुलींना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.
नायजेरीयावरून आलेल्या महिलेची लक्षणं अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कोणतीही लक्षण नाही. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ६ पैकी ३ जण १८ वर्षांखालील असल्याने त्यांनी लस घेतली नाही. तर उर्वरित ३ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. हे सर्व रुग्ण महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात उपचार घेत असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पिंपरी चिंचवड शहरासह पुण्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
















