- पिंपरीतील महिंद्रा लाईफ स्पेसेसच्या साइटवरील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिका भवनाशेजारी सुरू असलेल्या बांधकाम साईटवर पाणी मारण्याचे काम करीत असताना एका कामगाराचा पडल्याने मृत्यू झाला आहे. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली.
सतीश बन्सीराम आडे (वय २४, रा. जाधववाडी) असे त्या कामगाराचे नाव आहे. त्यानुसार पंकज गवारे (वय ३८ रा. पिंपरी), नागेश (वय ३०, रा. पिंपरी), जी एम सर्व्हिसेस कंपनीचे या कामाशी संबंधित सर्व व्यक्ती आणि महिंद्रा लाईफ स्पेसेसचे या कामाशी संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश येथील महिंद्रा लाईफ स्पेसेस या बांधकाम साईटवर पाणी मारण्याचे काम करत होता. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पाणी मारत असताना सतीश बांधकामावरून खाली पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींनी सतीश याला सुरक्षेची कोणतीही साधने पुरवली गेली नाहीत. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















