- थेरगावमधील घटना; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२१) :- थेरगाव येथे शनिवारी मध्यरात्री फिर्यादी त्यांच्या मित्राला त्याच्या घरी सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते थेरगाव लिंक रोड येथे आले असता चार जणांनी त्यांना अडवले.
मित्राच्या खिशातून जबरदस्तीने आठ हजारांचा मोबाईल फोन आणि ७०० रुपये रोख रक्कम आरोपींनी काढून घेतली. त्यानंतर फिर्यादी यांच्या खिशातून ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण दादासाहेब गोमे (वय २४, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















