न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जाने.) :- सोसायटीच्या बैठकीमध्ये वीज चोरीकडे लक्ष वेधले तसेच चोरी रोखण्याबाबत जाब विचारला असता ४२ वर्षीय महिलेला शिविगाळ करीत तिचा विनयभंग करण्यात आला.
रुजय मस्करेन्स (रा. दापोडी) असे आरोपीचे नाव असून, त्याने ही बाब वैयक्तीक घेत महिलेसोबत भांडण केले. तसेच महिलेला सर्वांसमक्ष शिवीगाळ केली. अश्लिल शब्दांचा वापर करत तिचा विनयभंग केला. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.











