- पिंपरी चिंचवड आरटीओकडून उपस्थित राहण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून परिवहन संवर्गातील वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाबाबत ऑनलाइन पूर्ववेळ घेण्याचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी नियोजित तारीख घेऊन महिन्याच्या प्रत्येक शनिवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
परिवहन संवर्गातील वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी कार्यालयात मालवाहतूक वाहनांसाठी १५४, टुरिस्ट टॅक्सी ३४, ऑटोरिक्षा ९, तीन चाकी मालवाहतूक वाहने ६ आणि बस २३ याप्रमाणे कोटा ठरविण्यात आला आहे.
वाहनधारकांनी योग्यता प्रमाणपत्र आणि वाहन तपासणीसाठी प्रत्येक शनिवारी पूर्ववेळ घेऊन वाहनासह उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.