- चाचणी अधिक पारदर्शी होण्यास मदत – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मैदानी चाचणीत होणाऱ्या रनिंगसाठी ‘ टायमिंग चिप ‘ चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे त्यात कोणालाही अफरातफर करता येणार नाही. परिणामी ही चाचणी अधिक पारदर्शी होण्यास मदत होणार आहे.
पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीपैकी ११ हजार ५३४ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. लेखी परीक्षा चोख पद्धतीने झाली. त्याच पद्धतीने मैदानी चाचणीही घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
कृष्ण प्रकाश म्हणाले, भरती प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. लेखी परीक्षेपूर्वी आणि त्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रकरणात गुन्हे दाखल केले असून आरोपींना अटक केली आहे. रनिंगसाठी टायमिंग चिपचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे वेळेबाबत कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही.