- बळजबरीने पैसेही घेतले; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२१) :- दापोडीतील न्यू स्टेटस सलून नावाच्या केस कापण्याचे दुकानात शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी आले. आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी कोयता उलट्या बाजूने फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीला दुखापत केली.
‘मेरे बच्चे लोगो का फ्री मे बाल काटने का, नही तो तेरा दुकान तोड दुंगा’, असे आरोपी म्हणाला. त्यानंतर आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या दुकानातील काच फोडून दुकानाच्या गल्यातील एक हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आम्ही दापोडीचे भाई आहोत, आमच्या पोलीस स्टेशनला भरपूर गुन्हे दाखल आहेत. तू इथून पुढे आम्हाला हप्ता द्यायचा, अशी धमकी आरोपींनी दिली.
दुकानाच्या बाहेर येऊन आरोपींनी दहशत पसरविण्यासाठी आरडाओरडा केला. लाकडी दांडक्यांनी दुकानाच्या दरवाजावर मारून दुकानाचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. समसाद रफिक शाह (वय २२, रा. दापोडी, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी शनिवारी (दि. ११) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ओमकार गायकवाड, राम कांबळे, सैफाली रैन (तिघेही रा दापोडी) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.