- आईलाही मारहाण; इंद्रायणीनगरमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२१) :- व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्याचा राग आल्याने मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांच्या गालावर मारून त्यांचा दात पाडला. आईने मध्यस्ती केली असता तिला देखील मारहाण केली. फिर्यादीच्या भाडेकरूंकडे पैशांची मागणी केली व दुकाने जाळण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
१६ ऑक्टोबर ते १० डिसेंबर या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे ही घटना घडली. आरोपीचे वडील पुरूषोत्तम सिताराम चौकडे (वय ६५, रा. इंद्रायणी कॉलनी, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १०) फिर्याद दाखल केली आहे.
पराग पुरूषोत्तम चौकडे (वय ३५, रा. लांडगे वस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.