न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने नोव्हेंबर २०२० मध्ये पाच साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर खुन्नसमधून कोयत्याने वार करीत खुनी हल्ला केला होता. हा आरोपी रविवारी (दि. १२) भारतनगर येथील ब्रिजखाली कोयता घेऊन आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करीत कोयता जप्त केला. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई विकास रेड्डी यांनी फिर्याद दिली आहे. अनिस उर्फ सनी फिरोज शेख (वय २०, रा. भारतनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.