- फेरीवाल्यांना लकी ड्रॉद्वारे पद्धतीने जागांचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- चिंचवडगावातील चापेकर चौक येथील फेरीवाल्यांचे चिंचवड भाजी मंडईत जागा देऊन पुनर्वसन केले जाणार आहे. यामुळे चापेकर चौकातील रस्ते अतिक्रमण मुक्त होणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी (दि. १०) लकी ड्रॉद्वारे जागा वाटप करण्यात आल्याची माहिती ब प्रभाग सभापती सुरेश भोईर यांनी दिली.
सध्या चिंचवडगावातील चापेकर चौक आणि आसपासच्या परिसरात येथील फेरीवाल्यांमुळे रस्त्यावरून चालनेही नागरिकांना मुश्किल होत आहे. दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढतच चालली आहे.
आता या फेरीवाल्यांना चिंचवड भाजी मंडईत जागा देण्यात येणार असल्याने भविष्यात त्यांना रस्त्यावर धंदा करता येणार नाही. त्यांचे पुनर्वसन करण्याच्या हेतूने प्रभाग सभापती नगरसेवक सुरेश भोईर, प्रशासन अधिकारी सोनम देशमुख यांनी सर्व परवानाधारक व्यावसायिकांना ‘ लकी ड्रॉ ‘ पद्धतीने जागा वाटप केले. सुमारे ५५ ते ६० जणांना ‘ लकी ड्रॉ ‘ द्वारे जागा आरक्षित करून देण्यात आल्या.