- रात्रीच्या वेळी देखील या सुरक्षारक्षकांचा असणार पहारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील ‘ बीआरटी ‘ च्या वेगवेगळ्या मार्गांवर जवळपास दोनशे सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. सात मार्गावर रात्रीच्या वेळी व निगडी ते दापोडी या मार्गावर सकाळी सुरक्षारक्षक नेमले आहेत.
जुन्या पुणे – मुंबई मार्गावरील निगडी ते दापोडी या बीआरटी रस्त्यावर खासगी वाहनांची घुसखोरी वाढली होती. त्यानुसार त्याबाबत तक्रारी आल्यानंतर या मार्गावर सकाळच्या सत्रात सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. ते खासगी वाहनांना या मार्गाचा वापर करण्यास प्रतिबंध करत आहेत. तसेच, इतर मार्गावर रात्रीच्या पाळीत सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.
या मार्गावर बांधून झालेल्या बीआरटी बस थांब्यांमध्ये काही प्रमाणात चोऱ्या होऊ लागल्या आहेत. ते रोखण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी बीआरटी मार्गावर माजी सैनिकांची नेमणूक केली होती. मात्र, आता इतर ठेकेदाराकडून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.