न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने मोरवाडीतील म्हाडा कॉलनी परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करीत २९ टपऱ्या जप्त केल्या. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
म्हाडा कॉलनी, मोरवाडी, एसएनबीपी शाळा परिसरातील पदपथावर गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत अनेक टपऱ्या आहेत. त्यामुळे भूमिगत केबल टाकण्यास आणि पदपथ तयार करण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे त्या टपऱ्या पोलिस बंदोबस्तांत पथकाने हटविल्या आहेत.
जप्त केलेल्य टपऱ्या नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम गोदामात जमा करण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत बीट निरीक्षक जयंत मरळीकर, इम्रान पठाण, साहेबराव पवार, संध्या साखरे यांच्यासह पोलिस व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
















