- तब्बल १६ कोटी रुपयांचा होणार खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२१) :- महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कॉरिडॉर, इनडोअर शौचालय, स्वच्छतागृह रुग्णालयाच्या बाह्य परिसरातील रस्ते स्वच्छतेचे काम यांत्रिक पद्धतीने तसेच मनुष्यबळाद्वारे करण्यात येणार आहे.
त्यासाठी तीन वर्षे कालावधीकरिता ठेकेदाराची नेमणूक केली जाणार असून, तब्बल १६ कोटी रुपये खर्च होणार आहे. वायसीएममधील पार्किंग, उद्यान व रुग्णालयातील डक्ट आणि ड्रेनेज लाइन साफसफाई आणि स्वच्छतेचे काम यांत्रिक पद्धतीने अत्याधुनिक उपकरणे, रसायने तसेच मनुष्यबळाद्वारे करण्यात येते. ही साफसफाई व स्वच्छता करून घेण्यासाठी इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविल्या होत्या.