- आज ३४ कोरोनाबाधित; २५ डिस्चार्ज, एकही मृत्यू नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २१) रोजी ५६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७८४०५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५१९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०० एवढी आहे.
दरम्यान आज मंगळवारी (दि. २१) रोजी ओमीक्रोनबाधित एक नवीन रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयमध्ये दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे. एकूण ४६ कोविड १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ३० रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाश्यांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.