- दहावीची १५ मार्च तर, बारावीची परीक्षा चार मार्चपासून सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२१) :- उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. चार मार्च २०२२ ते सात एप्रिल २०२२ या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. कोरोना महामारीमुळे २५ टक्केंचा अभ्यास याआधीच कपात करण्यात आला आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील, असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. अखेर आज दहावी-बारवी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी, दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ याकालावधीत पार पडेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे…
दहावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर…
१५ मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
१६ मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
१९ मार्च : इंग्रजी
२१ मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२२ मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
२४ मार्च : गणित भाग – १
२६ मार्च : गणित भाग २
२८ मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१ एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर १
४ एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर २
बारावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर…
४ मार्च – इंग्रजी
५ मार्च – हिंदी
७ मार्च – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
८ मार्च – संस्कृत
१० मार्च – फिजिक्स
१२ मार्च – केमिस्ट्री
१४ मार्च – माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
१७ मार्च – बायोलॉजी
१९ मार्च – जियोलॉजी
९ मार्च- ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
११ मार्च – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
१२ मार्च – राज्यशास्त्र
१२ मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1
१४ मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 2
१९ मार्च – अर्थशास्त्र
२१ मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
२३ मार्च – बँकिंग पेपर – 1
२५ मार्च – बँकिंग पेपर – 2
२६ मार्च – भूगोल
२८ मार्च – इतिहास
३० मार्च – समाजशास्त्र
कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच बाराचीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि दहावीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे गायकवाड यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.