न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जाने.) :- रोटरी क्लब ऑफ़ आकुर्डी, वसंत ग्रूप आणि नॅशनल सोशल ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दहा लाख खर्च करून निघोजे( कुरणवस्ती) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला बांधून दिलेल्या ४ खोल्यांचे हस्तांतरण सोहळा पार पडला.
हॅपी स्कूल उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या शाळेच्या एका मजल्याचे संपूर्ण बांधकाम करून दिले. तसेच शाळेला ई लर्निंग, बेंचेस, ग्रंथालय, वाटर प्युरिफायर मशीन, रंगरंगोटी व इलेक्ट्रिकल कामे कामे करून दिल्याने शाळेचा कायापालट झाला.
हस्तांतरण कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीए महेश्वर मराठे, वसंत ग्रूपचे अध्यक्ष अनिल मित्तल, रोटरी क्लबचे नियोजित अध्यक्ष जिग्नेश आगरवाल, रोटरीच्या शैक्षणिक उपक्रमाच्या प्रांतीय प्रमुख डॉ.उज्वला जोशी, पंकज देशमुख, नॅशनल सोशल ग्रूपचे अध्यक्ष कैलास पारिक, प्रल्हाद पारिक, निघोजे गावाचे माजी उपसरपंच आशिष येळवंडे, सदस्य सुनीता शिंदे, ज्ञानेश्वर येळवंडे, मुख्याध्यापक सुखदेव मुंगसे आदी उपस्थित होते.
यावेळी उज्ज्वला जोशी यांनी हॅपी स्कूलची संकल्पना विशद केली. अनिल मित्तल म्हणाले कि,शेतकऱ्यांसाठी दर गुरुवारी वसंत ग्रूपच्या वतीने प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहे. तसेच या शाळेत संस्कृत भाषा वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ आहे.
मुंगसे म्हणाले की, मोडकळीस आलेल्या आमच्या शाळेला एका कंपनीने तळ मजला बांधून दिला. तरीसुध्दा मुलांना जागा अपुरी पडत होती. रोटरी क्लब ऑफ आकुर्डी, नॅशनल सोशल ग्रूप व वसंत ग्रूपने दुसरा मजल्याचे संपूर्ण बांधकाम करून दिले व सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच रामदास येळवंडे, रोटरीचे पंकज देशमुख, जितेंद्र शर्मा, मनिष चुघ, विनोद वान्हेरे, संजीव खिंवसरा, प्रवीण अगरवाल, आरती कुरमा, नॅशनल सोशल ग्रूपचे महादेव कोळेकर, विकास पाटील, एस बी पारिक, दीपक मसुरे, सावन वाळके, शौकत भाई आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन मुख्याध्यापक मुंगसे, तर आभार उज्वला जगताप यांनी मानले.











