न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जाने.) :- सारा सिटी फेज डी सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये ७० वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा साजरा करण्यात आला. खेड तालुका शिवसेनेच्या महिला अध्यक्षा नंदाताई कड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी भरत बिरदवडे, भगवान चौधरी, बाळासाहेब कड, हरीश बारुखा, सोसायटीचे अध्यक्ष दिनेश कड, खजिनदार बाबुराव कदम, सचिव मल्हारी घाडगे, संजय पालुतकर, दत्ता टाकळकर, योगेश टेकाळे, सुहास हट्टीकर, पोलीस पाटील किरण कीर्ते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सुरक्षारक्षकांच्या संचलनाने झाली. ध्वजवंदन आणि प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त सोसायटीतील महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सायंकाळी विविध देशभक्तीपर गीतांचे गायन, नृत्य बालचमूंनी सादर केले.











