- कांतीलाल शाह विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जाने.) :- तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या कांतीलाल शाह विद्यालयात ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवना हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. सत्यजीत वाढोकर व इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे खजिनदार रामदास काकडे उपस्थित होते.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार कृष्णराव भेगडे, नम्रता शाह, शर्मिला शाह, प्राची शाह, यशवंत पाटील, मुख्याध्यापिका सुमन रावत, स्मिता पेंडुरकर यांच्यासह पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संचलन केले आणि विविध लोकनृत्यातून ‘विविधतेत एकता’ हा संदेश दिला. तसेच चार हाऊसेसनी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. रामदास काकडे यांच्या हस्ते खेळाच्या मैदानाचे उद्घाटन झाले. प्राची शाह यांनी रिडिंग क्लबची माहिती देत उद्घाटन केले.
रामदास काकडे म्हणाले, की खेळ हा निरोगी व सुदृढ शरीरासाठी अत्यावश्यक आहे. तसेच ‘वाचाल तर वाचाल’ म्हणजेच विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे.
डॉ. सत्यजीत वाढोकर म्हणाले, की विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना स्वतःची आवड जपली पाहिजे. आजच्या दिनाचे महत्व सांगून शाळेच्या सस्कृतीचे कौतक केले यावेळी आदी मान्यवर व पालक व माजी विध्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या शिक्षिका संजाली गरुड व प्रिया पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन वैशाली शिंदे व सौजन्या बकरे यांनी, तर आभार प्रिया पटवर्धन यांनी मानले.











