- तब्बल ६६१६ ब्रास इतक्या माती-मुरूमाचे अनधिकृत उत्खनन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२१) :- थेरगावातील गट नं. २१/३ब/४अ/१/३, २१/४ड/५अ, २१/४क, २२/२, २१/४ब/४, २१/४ ब/३, २१/४ब/२ व इतर मध्ये महसूल विभागाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सोनिगरा रिअलकॉन यांनी मोठ्या प्रमाणावर गौणखनिज उत्खनन करून त्याची वाहतूक केली. तब्बल ६६१६ ब्रास इतके माती /मुरूम याचे अनधिकृत उत्खनन केले. याबाबत मुळशी तहसीलदार यांनी नोटीस बजावली आहे.
नोटिशीत म्हटले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये ते दंडास पात्र ठरले आहेत. त्यासाठी मुळशी तहसील कार्यालयाने सोनिगरा रिअलकॉन तर्फे भागीदार भावेश भागचंद सोनिगरा यांना एकूण रॉयल्टी आणि दंड मिळून २ कोटी अठ्याऐंशी लाख अडुसष्ट हजार चारशे ब्यानव रुपये एवढा (२,८८,६८,४९२ ) दंड भरण्याबाबत नोटीस बजावली आहे.
मुदतीत खुलासा सादर न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७६, १७८ ते १८४ प्रमाणे जमीन महसुलाच्या थकबाकीपोटी स्थावर आणि जंगम मालमत्तेतून दंड वसूल केला जाईल, असे मुळशी तहसीलदार अभय चव्हाण यांनी नोटिशीत म्हटले आहे.
शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. गौणखनिज वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री व वाहने जप्त करण्यात यावीत. दुर्लक्ष करणाऱ्या हद्दीतील तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभांगाची कारवाई करण्यात यावी.
– सिद्दीकभाई शेख (अध्यक्ष-अपना वतन संघटना)…