न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपीला २६ मार्च २०२१ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता भोसरी पोलीस त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी शांतीनगर, भोसरी येथे घडली.
पोलीस शिपाई सुमित देवकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रवींद्र बन्सीलाल भालेराव (वय २२, रा. लांडगेवस्ती, भोसरी) असे धमकी देणा-या आरोपीचे नाव आहे.















