न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२१) :- पहिले लग्न झालेले असतानादेखील फिर्यादी महिलेसोबत दुसरे लग्न करण्यास आरोपी तयार झाला. त्याने पहिल्या लग्नाबाबत फिर्यादी यांना काहीही सांगितले नाही.
फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या इराद्याने तो फिर्यादींसोबत लग्न करण्यासाठी तयार झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना नोव्हेंबर ते २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत बोपखेल येथे घडली.
३० वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन जालिंदर गायकवाड (रा. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.















