- पाण्याच्या टँकरखाली आल्याने तीन वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२१) :- चिखलीतील ऐश्वर्यम हमारा सोसायटीमध्ये टँकरने पाणी पुरविण्याचे काम सुरु असताना दुपारी बाराच्या सुमारास तीन वर्षीय मुलगा टँकरखाली आला.
गंभीर जखमी झालेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अदनान शमशुद्दीन मणिहार (वय ३) असे त्या मुलाचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.