न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ३१ डिसेंबरच्या रात्री सांगवीमध्ये धाड टाकून नेपाळी तरुणींची सुटका केली. यात आसाम, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचं समोर आलं. सांगवी पोलीस ठाण्याच्या अवघ्या काही मीटर अंतरावर हा गोरख धंदा सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवी सांगवी, कृष्णा चौक येथे ब्रीडल स्पा अँड ब्युटीमध्ये वेश्या व्यवसाय केला जात होता. याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी देवेंद्र चव्हाण यांना मिळाली.
यानंतर छापा टाकून नेपाळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील एक अशा एकूण ८ महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा सेंटर चालक पार्थ महंती आणि मॅनेजर लतीफ शेखला अटक करण्यात आली.















